¡Sorpréndeme!

महिलांनी केला विश्‍वविक्रम, जाणून घ्या कशाचा आहे विक्रम | Womens Creat World Record | Amazing News

2021-09-13 15 Dailymotion

छत्तीसगढमध्ये दुर्ग जिल्ह्यातील महिलांनी नृत्याचा एक विश्‍वविक्रम स्थापन केला आहे. जिल्ह्यातील 15 हजार महिलांनी एकत्र येऊन सुआ नृत्य केले आणि हा विक्रम झाला.

छत्तीसगढच्या संस्कृतीत या नृत्याला महत्त्व आहे. भिलाईच्या जयंती स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. रमनसिंह उपस्थित होते.

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कलाकार तीजन बाई याही उपस्थित होत्या. स्टेडियममध्ये पंधरा हजार महिलांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत सलगपणे हे नृत्य केले. हे नृत्य शिवपार्वती पूजेचे असते. शिवविवाहातील आनंद या नृत्यामधून दर्शवला जातो. छत्तीसगढमधील लोककलेला उत्तेजन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews